Arjun Khotkar : शेत रस्त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार

शेत रस्त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली.
Arjunrao Khotkar
Arjunrao Khotkar : शेत रस्त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणारFile Photo
Published on
Updated on

Arjun Khotkar: Maximum funds will be made available for farm roads.

जालना, पुढारी वृत्तसेवा : शेत रस्त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली.

Arjunrao Khotkar
धान्यात कीडनाशक गोळ्या ठरु शकतात जीवघेणे

जालना तहसीलदार कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनाअंतर्गत जालना विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थान विधानसभा क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी भूषविले.

या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचे काम दर्जेदार, टिकाऊ व वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार खोतकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Arjunrao Khotkar
Jalna murder case : जालना खून प्रकरण काही तासांत दोघांना बेड्या

ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून ग्रामीण विकासासाठी मोलाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा विषय मांडून या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

पाणंद रस्त्याचे प्रस्ताव समितीकडे पाठवा

बैठकीदरम्यान जालना विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित बळीराजा शेत पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने तयार करून जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश आमदार खोतकर यांनी समितीच्या सदस्यांना दिले. नवीन प्रस्तावित रस्ते, निधीचे नियोजन, कामांची गुणवत्ता तसेच अंमलबजावणी याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news