

Pesticide tablets in grains can be deadly
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : गहू, तांदूळ, कडधान्यांना भुंगा, सोंड व इतर किडींपासून वाचवण्यासाठी बोरिक पावडर, सेल्फॉसमधील कीडनाशक गोळ्या आणि इंजेक्शन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र धान्यात रासायनिक कीडनाशक वापरताना काळजी घेणे आवश्यक आहेत.
धान्य कीडमुक्त करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे आणि योग्य व मोकळ्या जागी धान्य साठवणे ही सोपी आणि प्रभावी पद्धत आहे.
याशिवाय, कडुलिंबाची पाने, लवंग, लसूण या नैसर्गिक कीडनाशकांचा वापर केल्याने धान्य सुरक्षित राहते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी नैसर्गिक कीडनाशक करावे. धान्य टिकवण्याच्या नादात अनेक शेतकरी जीव धोक्यात येत आहे. सुरक्षिता न बाळगता आणि योग्य खबरदारी न घेता धान्य साठवणूक करताना होणाऱ्या अपघातांमुळे मोठ्या आर्थिक आणि मानवी नुकसानाला सामोरे जावे लागत आहेत.
धान्यात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पावडर व गोव्यांमुळे विषबाधेचा धोका निर्माण होतो. त्यातं शरीराला अपायकारक रासायनिक घटक असतात. किंवा अनियंत्रित वापरामुळे मानव आणि पर्यावरणाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विषबाधाही होऊ शकते. त्यामूळे धान्यावर नैसर्गिक प्रक्रिया करणे टाळलेलेच बरे आहे.
विषबाधेची लक्षणे प्रामुख्याने उलटी, ताप, अतिसार, श्वास घ्यायला त्रास, त्वचेवर पूरळ, डोकेदुखी आणि थकवा अशा स्वरूपाची असतात. गंभीर प्रकरणांमध्ये शरीरात जलद घाम येणे, चेतना हरवणे किंवा श्वासोच्छवास थांबणे यासारखे गंभीर लक्षणेदेखील दिसू शकतात. विषबाधा झाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.