

Approval for Panand roads worth Rs 30 crore in Jalna constituency
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना नेते आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामसमृद्धी मातोश्री शेत पानंद रस्त्यांच्या कामांना पाठपुरावा करुन ३० कोटी रुपयांची कामे मंजुरी मिळवून घेतली आहे.
आमदार खोतकर यांच्या प्रयत्नातुन जालना मतदारसंघात जवळपास ३० कोटी रुपयांच्या पाणंद रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाणंद रस्ते व्हावी अशी मागणी केली होती. त्यानुषंगाने आमदार खोतकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्याकडे पाठपुरावा करून शेत पाणंद रस्त्याच्या कामांना मान्यता मिळवून घेतली. या निर्णयामुळे जालना मतदारसंघातील शेतपाणंद रस्त्याचा प्रश्न निश्चित सुटणार असून जवळपास प्रती कि.मी लांबीचा असून यामुळे मतदार संघातील १२५ रस्ते होणार आहेत. यासाठी अंदाजे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
खोतकरांनी मानले आभार
दीपावलीपूर्वी ही आनंदवार्ता शेतकऱ्यांचा त्रास कमी करणारा ठरणार आहे. या कामांना मंजुरी मिळवून दिल्याबद्दल आमदार खोतकर यांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भरतशेठ गोगावले यांचे आभार व्यक्त केले आहे.