Leopard News : बिबट्याकडून काळविटाची शिकार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुक परिसरात बिबटयाने मोठी दहशत केली आहे.
Leopard News
Leopard News : बिबट्याकडून काळविटाची शिकार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण File Photo
Published on
Updated on

Hunting of blackbuck by leopard; fear among farmers

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुक परिसरात बिबटयाने मोठी दहशत केली आहे. बिबटयाने शिकार केल्याची घटना रविवारी (दि.१२) सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे शेतकरी व शेत मजुर यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard News
Jalna Rain Damage : जमीन खरेदीला 'बागायती'; मदतीच्या वेळी 'कोरडवाहू'

मे महिन्यापासून बिबट्याचा पिंपळगाव रेणुकाई परिसरात वावर असल्याचे निष्पन्न झाले होते. वन विभागाने याबाबत दोन ते तीन वेळेस पिजरा लावून बिबट्या अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याने पिंजऱ्यात दुजोरा देऊन फरार झाला असल्याने वन विभाग त्याला पकडण्यासाठी हातबल झाले आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत अजून पर्यंत सुद्धा बिबट्या हा पिंजरा बंद न झाल्यामुळे परिसरात दहशत असल्याकारणाने शेतात सध्या खरीप हंगामा मधील मक्का, सोयाबीन व कपाशीला पाणी देण्यासाठी रात्रीची लाईट असल्याकारणाने शेतकरी आपल्या विहिरीवर शेतात जाऊन पाणी भरण्यासाठी जात असतात मात्र बिबट्याने शिकार केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्री शेतात मोटर चालू करण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी करजगाव रोडवर असलेल्या विहिरीवर बिबट्याने काळविटाची शिकार केली असल्याने बघितले. त्यामुळे वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा. यामुळे शेतात सोंगणीला मजूर येत नसून शेतकऱ्यांना आता सध्या मोठे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
ज्ञानेश्वर राऊत, शेतकरी
Leopard News
Jalna News : वाकडी-आसडी पाणंद रस्त्याची लागली वाट
रब्बी हंगामासाठी शेतात शेत तयार करून गहू, हरभरा, आधी पिकांची लागवड करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जमीन तयार केली आहे. त्यामुळे शेतात स्प्रिंकलर व इतर कामे शेतात जाऊन रात्रीची मोटर चालू करावी लागत आहे त्यामुळे महावितरण कंपनीने रात्रीची लाईट न देता दिवसाची लाईट द्यावी जेणेकरून बिबट्याच्या धास्तीने शेतकरी दिवसा आपले कामे करून घेतील.
-गणेश नरवाडे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news