Another accused arrested in grant scam
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात झालेल्या २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्यातील अंबड तहसील कार्यालयातील फरार तलाठी आरोपी कल्याणसिंग अंबरसिंग बमनात यांना आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून जेररबंद केले.
अंबड, घनसावंगी व जालना तालुक्यात झालेल्या २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये चौकशी समिती गठित करण्यात आली होती. चौकशी समितीने चौकशी करून यातील संबंधित आरोपितांनी स्वतःचे ओळ-खीचे, नातेवाईक, मित्र परिवार यांचे बनावट, दुबार, क्षेत्रवाढ, जिरायत जमिनी बागायत दर्शविणे, शासकीय जमीन (गायरान) नावावर दर्शवून नैसर्गिक आपत्ती अनुदान याद्यामध्ये नावे अपलोड करून शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानांची २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांची रक्कम आपसांत वाटून घेतली.
फरार आरोपितांचा शोध सुरू
आर्थिक गुन्हे शाखेतील शोध पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून आरोपी कल्याणसिंग अंबरसिंग बमनात (रा. निहालसिंगवाडी, ता. अंबड जि. जालना) यास अटक केली. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपितांचा शोध सुरू आहे.