

Anganwadi school wall collapsed
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवाः जाफ्राबाद तालुक्यातील आळंद येथील अंगणवाडी शाळेची भिंत पावसामुळे कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री (ता.११) घडली. या घटनेमुळे तालुक्यातील आंगणवाडीत शिकत असलेल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने रात्रीची वेळ असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आळंद येथील अंगणवाडी शाळेची भिंत पावसामुळे शुक्रवारी रात्री कोसळली. यामुळे मोठा अनर्थ टळला. शाळेची भिंत कोसळल्याने अंगणवाडी शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांना आता उघड्यावरच बसावे लागणार का असा प्रश्न आहे. गावात पर्यायी आंगणवाडी ची खोली बांधण्यात आली असुन ती गावापासून दुर असल्यामुळे जीर्ण झाली आहे.
गावातील लहान मुलाना तेथे जिव मुठ्ठीत धरुन शिक्षण घ्यावे लागत होते. शाळेची भिंत कोसळल्याने गावातच चिमुकल्यांना पर्यायी आंगणवाडीची खोली बांधून द्यावी असी मांगणी आंगणवाडी सेविका कमल रुस्तुम पुंगळे यांनी केली. या अंगणवाडी शाळेची मागील अनेक दिवसापासुन दुरव्यस्था झाली होती. संबंधित विभागाकडे वेळोवेळी या बाबत पाठपुरावा करुनही विभागाने या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप युवा सेना तालुका उपप्रमुख उमेश गायकवाड यांनी केला आहे.