समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिका अडवली; तपासणीत तरुणाचा मृतदेह आढळला

ठाणेहून नांदेडकडे जाताना जालना टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांची कारवाई
jalna news
समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिका अडवली; तपासणीत तरुणाचा मृतदेह आढळलाfile photo
Published on
Updated on

Ambulance stopped on Samruddhi Expressway; young man's body found during inspection

जालना, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावरून ठाणे येथून नांदेडकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका जालना येथील टोल नाक्यावर शुक्रवार, दि. २७ रोजी रात्री समृध्दी महामार्ग पोलिसांनी अडवली. तपासणीदरम्यान रुग्णवाहिकेत सुमारे ३० ते ३५ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली.

jalna news
Beed Crime News : तरूणास जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद

पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका जालना शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयात हलवली. मृत तरुणाचे आई-वडील, बहीण आणि लहान भाऊ हे कुटुंबीय त्याला नांदेड येथील गावी घेऊन जात होते.

मृत तरुणाचे नाव विजय विकास थोरात (वय अंदाजे ३५) रा. (घोडबंदर रोड, डोंगरीपाडा कासार वडवली पो.स्टे. हद्द) असे असून, तो मानसिक आजाराने त्रस्त होता. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देता थेट रुग्णवाहिकेतून मृतदेह नांदेडकडे नेण्याचा निर्णय घेतला. नांदेड येथील सिडको मध्ये या कुटुंबियाचे घर आणि नातेवाईक आहेत.

jalna news
Nanded News : 'त्या' स्फोटांचे गूढ वाढले; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

दरम्यान, ठाणे येथील किंग काँग नगर परिसरातील शेजाऱ्यांनी ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ठाणे येथील कासार वडवली पोलिसांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग करत समृद्धी महामार्ग पोलिसांच्या मदतीने जालना टोल नाक्यावर रुग्णवाहिका अडवली.

सध्या मृतदेह जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला असून, शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सदरील प्रकरण घातपात आहे की अजून काही हे पोलिस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news