

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री शिवारातील १० शेतकऱ्यांच्या सोलार मोटरचे वायर जाळून त्यातील तांब्याची तार चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. अंदाजे ८०० ते ९०० फूट वायर जाळून त्यातील तांब्याची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून शेतकऱ्यांचे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील शेतकरी संजीवनी बप्पासाहेब काळे, महेंद्र सुभाष मांगदरे, बेबीताई सुभाष मांगदरे, विजय अंबादास पवार, आनंद अंबादास पवार, संदीप अशोक काळे, अशोकराव काळे, नितीन काळे आदी शेतकऱ्यांचे बोअर व विहिरी वरील सोलारच्या मोटरचे वायर चोरट्यांनी तोडून ते जाळून त्यातील तांब्याची तार चोरून नेली आहे.
एका शेतकऱ्याचे १०० ते १५० फूट वायर लागते. अंदाजे ९०० फूट वायर चोरीला गेले आहे. या चोरी प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात वायर चोरीची तक्रार देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.