Jalna sand shortage : बांधकामे ठप्प; वाळूचे दर गगनाला

वाळू घाट कधी सुरू होणार? घरकुलधारकांचा सवाल; चढ्या दरामुळे खरेदी अशक्य
Jalna sand shortage
बांधकामे ठप्प; वाळूचे दर गगनालाpudhari photo
Published on
Updated on

वडीगोद्री ः अंबड तालुक्यातील घरकुल धारकाला,नागरिकांना, शासकीय कामांना बांधकाम करण्यासाठी गेल्या दोन तीन महिन्या पासून वाळू मिळत नसल्याने बांधकामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यात अंबड तालुक्यातील गंधारी, डोमलगाव, साष्टपिंपळगाव, बळेगाव या चार वाळू घाटाचे लिलाव झालेले असताना वाळू लवकर मिळण्यासाठी वाळू घाट कधी सुरू होणार कधी मुहूर्त लागणार असा सवाल घरकुल धारक व बांधकाम करणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

अंबड तालुक्यात गेल्या काही महिन्यापासुन अवैध वाळू बंद आहे. यामुळे अंबड तालुक्यात वाळू मिळत नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना घर बांधकामसाठी हे वाळूचे दर पुरत नाही वाढत्या वाळू दरामुळे बजेट वाढते यामुळे घरकुल योजना,शासकीय बांधकामे,खाजगी बांधकामे बंद ठेवण्यात आली आहे.याचा परिणाम काम करणाऱ्या मजुरांवर झाला असून त्यांच्यावर उपासमारीचे मोठे संकट आहे.

Jalna sand shortage
LPG cylinder misuse : अजिंठ्यात घरगुती गॅसचा अवैध व्यावसायिक वापर

महसूल प्रशासनाकडून अंबड तालुक्यातील गंधारी,डोमलगाव, साष्टपिंपळगाव, बळेगाव या ठिकाणचे वाळू लिलावा होऊन एक महिना उलटला आहे मात्र मात्र अद्यापही वाळू घाट सुरु न झाल्याने घरकुल, खाजगी बांधकाम व शासकीय बांधकाम ठप्प झाले असल्याने वाळूचे ठेके कधी सुरु होणार आमच्या घरकुलास वाळू कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे.

Jalna sand shortage
Ellora Grishneshwar temple : भाविकांना बाहेरूनच घ्यावे लागेल घृष्णेश्वराचे दर्शन

अवैध वाळू वर महसूल व पोलीस प्रशासनाकडून वारंवार कारवाई करून कोटयावधीचा दंड आकारण्यात आला व गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या मुळे अवैध वाळू ला लगाम लागला असून सध्या बांधकामासाठी वाळूच मिळत नसल्याने बांधकाम क्षेत्रासह त्यास निगडित असलेले पूरक व्यवसायातील अर्थकारण ठप्प झाले आहे.बांधकाम क्षेत्राची मुख्य मदार हि वाळू वर अवलंबवून असल्याने बांधकाम दाराची मोठी डोकी दुखी वाढली आहे.

वाळू घाटाचे आम्ही रीतसर टेंडर केले. आम्हाला गौण खनिज प्रशासनाकडून 9 डिसेंबर रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. आम्ही वाळू ठेका सुरू करण्यासाठीच्या सर्व अटी शर्ती पूर्ण केल्या आहे मात्र अद्याप आम्हाला वाळू घाटाचा ताबा देण्यात आला नाही. वाळू घाटाचा ताबा देण्यात यावा.

रविंद्र वाघमारे, डोमलगाव वाळूघाट

22 जानेवारी रोजी वाळू घाट धारक यांना गौण खनिज नियमांची पूर्तता करण्याचे पत्र देण्यात आले आहे. गौण खनिज च्या अटी शर्तीची पूर्तता करून वाळू घाटाचे फोटो महसूल प्रशासनास सादर केल्या नंतर वाळू घाटास ताबा देण्यात येईल.

विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news