LPG cylinder misuse : अजिंठ्यात घरगुती गॅसचा अवैध व्यावसायिक वापर

3.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींसह गॅस एजन्सी मालकावर गुन्हा
LPG cylinder misuse
अजिंठ्यात घरगुती गॅसचा अवैध व्यावसायिक वापरpudhari photo
Published on
Updated on

अजिंठा : अजिंठ्यात घरगुती वापरासाठी असलेल्या भारत गॅसचा अवैधरीत्या व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गालगत अजिंठा बसस्थानकाच्या अलीकडे असलेल्या हॉटेल शिफाजवळ सोमवारी (दि.2) सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सदरील प्रकरणात विशाल गॅस एजन्सीच्या मालक व आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका वेल्डिंग वर्कशॉपमागे घरगुती वापराचा भारत गॅस अवैधरीत्या वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती अजिंठा पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. सदर माहिती सहाय्यक पलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांना मिळताच त्यांनी हेड कॉन्स्टेबल दिलीप तडवी, रवींद्र बागुलकर व संजय कोळी यांच्यासह सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात घटनास्थळी विनाक्रमांकाचे वाहन आढळून आले.

LPG cylinder misuse
Chatrapati Sambhajinagar Crime : लासूर स्टेशन येथे भरदिवसा चोरी, 6 लाखांचा ऐवज लंपास

तपासणीदरम्यान वाहनात व परिसरात 21 भरलेले गॅस सिलिंडर (अंदाजे किंमत 63 हजार रुपये) सहा रिकामे सिलिंडर (अंदाजे किंमत 6,600 रुपये) गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी एक इलेक्ट्रिक मोटार (अंदाजे किंमत 2,000 रुपये) तसेच एक वाहन (अंदाजे किंमत 3 लाख 20 हजार रुपये) असा एकूण 3 लाख 91 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून दोन जणांना (अल्पवयीन मुलासह) ताब्यात घेतले आहे.

पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, शेख सलीम शेख युनूस (36) व एक अल्पवयीन मुलगा हे दोघेही अजिंठा येथील विशाल भारत गॅस एजन्सीचे मालक विशाल प्रभाकर देशमुख (चव्हाण) यांच्या आदेशावरून घरगुती वापरासाठी असलेले ज्वालाग््राही भारत गॅस सिलिंडर जादा रक्कम घेऊन वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे भरत होते. तसेच हा गॅस व्यावसायिक वापरासाठी वापरून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात होती.

LPG cylinder misuse
Ellora Grishneshwar temple : भाविकांना बाहेरूनच घ्यावे लागेल घृष्णेश्वराचे दर्शन

तिघांनी संगनमताने बेकायदेशीर गॅस पुरवठा व साठा केल्याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल दिलीप तडवी यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे करीत आहेत.

गॅस एजन्सीवर यापूर्वीही नागरिकांचे आरोप

गॅस एजन्सीबाबत यापूर्वीही अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्याचे समोर आले आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार गॅस बुकिंग केल्यानंतर ग््रााहकांना घरपोच गॅस सिलिंडर देताना नियोजित दरापेक्षा 20 ते 30 रुपये जादा रक्कम आकारली जाते. घरपोच सिलिंडर देताना ग््रााहकांना वजन करून दिले जात नाही, गॅस पुरवठ्यानंतर सुरक्षिततेची कोणतीही तपासणी केली जात नाही. रेग्युलेटर व गॅस लिकेज चेक न करता सिलेंडर दिला जातो. यामुळे ग््रााहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सर्व तक्रारींकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले असले, तरी आता झालेल्या पोलिस कारवाईमुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news