Jalna Crime : अंबडमध्ये गावठी कट्ट्याने धमकी; दोन ठिकाणी जमाव भिडल्याने तणाव

फॉर्च्युनर अंगावर घालण्याचा प्रयत्न; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
Jalna Crime
Jalna Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

अंबड : फायनान्सच्या गाडीवरून झालेल्या वादातून अंबड शहरात गुंडगिरीचा प्रकार घडला. सरकारी दवाखाना रोड व दत्ताजी भाले विद्यालय परिसरात दोन जमावांमध्ये गोंधळ झाला. शिवीगाळ, मारहाण आणि गावठी कट्ट्याने धमकावल्याच्या प्रकारामुळे शहरातील वातावरण तणावग्रस्त झाले. या प्रकरणी अंबड पोलिसात कुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास दत्ता लोहकरे व त्यांचे मित्र मनोज सांगळे हे सरकारी दवाखाना रोडवर असताना मनोज सांगळे यांना फोन आला. त्यानंतर दोघे संबंधित ठिकाणी गेले असता फायनान्सच्या गाडीवरून वाद सुरू झाला. वाद वाढत जाऊन शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

Jalna Crime
Jalna House Burglary : चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफासह दोन जणांना अटक

यावेळी बबलू भुंजगा पवार याने गावठी कट्टा दाखवून जिवे मारण्याची धमकी देत मारहान करायला सुरुवात केली. त्यानंतर फॉर्च्युनर गाडीतून आलेले बबलू भुंजगा पवार, गुन्या भुंजगा पवार व विनोद भुंजगा पवार यांनी गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला यामध्ये दोघेही बालमबाल बचावले.

घटनेनंतर आरोपी फॉर्च्युनरमधून जालना-बीड रोडच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर अंबड रोडवरील बालाजी हार्डवेअर दुकानाजवळ पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या कुणाल पवार व त्याच्या साथीदारानेही परत शिवीगाळ व मारहाण केली.

दरम्यान, दत्ताजी भाले विद्यालय परिसरात याच जमावांमध्ये गोंधळ झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लगेच मध्यथी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती शहरात पसरताच फिर्यादी दत्ता तुकाराम लोहकरे यांच्या बाजूने मोठा जमाव अंबड पोलिस ठाण्याबाहेर जमा झाला.

Jalna Crime
Sambhajinagar Sand Auction : कन्नड, वैजापूर, पैठणच्या ८ वाळू घाटांना मंजुरी

अंबड शहरातील होळकरनगर येथील दत्ता तुकाराम लोहकरे (वय ३६) तुकाराम लोहकरे यांच्या तक्रारीवरून बबलू भुंजगा पवार, गुन्या भुंजगा पवार, विनोद भुंजगा पवार व कुणाल पवार यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात मारहाण, धमकी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.