

अंबड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे अंबड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शासनाच्यावतीने शासकीय व निमशासकीय कार्यालयास सुट्टी जाहीर करून तीन दिवसांचा दुखावटा पाळण्यासंबंधी जीआर काढल्याने शहरातील शासकीय निमशासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आल्या होत्या.
अंबड शहरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते, व्यापारी, हॉटेल्स मालक, डॉक्टर्स, वकिलांनी घटनेचा दुखवटा पाळून स्वयंस्फूर्त अंबड शहर कडकडीत बंद ठेवत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले. शहरात अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे डिजिटल बोर्ड लावण्यात आल्याचे दिसून आले.