Jalna News : अंबड शहराला जायकवाडीचाच आधार; पंधरा दिवसांआड होतोय पाणीपुरवठा

अंबड शहर व परिसरातील पारंपरिक जलस्रोत दुष्काळामुळे अटू लागले आहेत. त्यामुळे जालना-अंबड जायकवाडी पाणीपुरवठा योजना हीच अंबड शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य आधार व्यवस्था ठरली आहे.
Jalna News
Jalna News : अंबड शहराला जायकवाडीचाच आधार; पंधरा दिवसांआड होतोय पाणीपुरवठाfile photo
Published on: 
Updated on: 

Ambad city relies solely on Jayakwadi; water is supplied once every fifteen days

राजेंद्र कळकटे

अंबड : अंबड शहर व परिसरातील पारंपरिक जलस्रोत दुष्काळामुळे अटू लागले आहेत. त्यामुळे जालना-अंबड जायकवाडी पाणीपुरवठा योजना हीच अंबड शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य आधार व्यवस्था ठरली आहे. शहरातील पाण्याच्या टाक्यांची संख्या आणि सध्याची वितरण व्यवस्था पाहता, अंबड शहरात तेराव्या ते चौदाव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात पाण्याची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Jalna News
MLA Hikmat Udhan : वीजबंदीच्या निर्णयात शिथिलता देण्यात यावी

अंबड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्या वाढीसोबत वाढत असलेली पाण्याची मागणी पाहता शहराला आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी अंबड शहराला पाणीपुरवठा करणारी डावरगाव तलावावरील योजना आता कालबाह्य झाली आहे.

जायकवाडी योजनेतून दररोज सुमारे दोन ते सव्वादोन एमएलडीजायकवाडी योजनेतून शहराला पाणी मिळू लागल्यानंतर डावरगाव योजनेकडे दुर्लक्ष झाले. त्यातच वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही कुचकामी असल्याने जायकवाडीतून मिळणारे पाणी हाव आता शहरासाठी प्रमुख आधार उरला आहे.

Jalna News
Jalna News : जाफराबादकरांना दहा दिवसांआड पाणीपुरवठा !

या कामाची वर्क ऑर्डर झाली असली तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. जलकुंभ पूर्ण झाल्यानंतर पाणी वितरणाची फेरी काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांना अधिक नियमित पाणीपुरवठा करता येईल, अशी माहिती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.