कृषिप्रधान भारतासाठी 'एआय' तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल

जिल्हाधिकारी : कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी शस्त्र
jalna news
कृषिप्रधान भारतासाठी 'एआय' तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेलfile photo
Published on
Updated on

AI technology will be a milestone for agriculture-based India

जालना, पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या - धावपळीच्या युगात प्रत्येक गोष्टीतील बारकावे मानवी बुद्धिमत्तेत साठवून ठेवणे आणि ते वेळेवर आठवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत माहितीचे अचूक विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भारतातील संगणक क्रांतीनंतरचा हा सर्वात मोठा बदल असून कृषिप्रधान भारतासाठी एआय तंत्रज्ञान मैलाचा दगड - ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी - आशिमा मित्तल यांनी केले.

jalna news
Jalna News : मनपाच्या कारभाऱ्यांनी स्वीकारला पदभार

जिल्हाधिकारी कार्यालयातील - जिल्हा नियोजन सभागृहात कृत्रिम बुध्दिमत्तेद्वारे कृषी तंत्रज्ञानाची प्रगती या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख्य वक्ते म्हणून फाइंडॅबिलिटी सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहुरकर, मॅजिकचे मकरंद कुलकर्णी, रितेश मिश्रा, डॉ. प्रसन्न भोगले यांच्यासह डॉ. मंदार कुलकर्णी, डॉ. दीपक बोरनारे, डॉ. गोपाळ शिंदे, प्रसाद कोकिल, सौरभ कदम, पुजा गोशेर, पी.टी. यशराज, मॅजिकचे व्यवस्थापक डी. एम. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतीमधील पिकांचे नियोजन, हवामानाचा अंदाज आणि कीड नियंत्रण यासाठी एआय तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरत असल्याचे त्या म्हणाल्या.

jalna news
आरोपी तलाठी बाबूसिंग जाधव याला पोलिसांनी सापळा लावून घेतले ताब्यात

चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे : सीईओ

फाइंडॅबिलिटी सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहुरकर म्हणाले, अन्नाची वाढती मागणी, हवामानातील अनिश्चितता आणि बाज-ारातील चढ-उतार यावर मात करण्यासाठी एआय माहितीचे अचूक विश्-लेषण करते. यामुळे पिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या तत्काळ शोधणे शक्य होते. आपल्याकडे चॅटजीपीटीलाच एआय समजले जाते, ही चुकीची संकल्पना आहे. वास्तवतः एआय ही कोणतीही जादू नसून ती माहिती विश्-लेषणाद्वारे अचूक निर्णय घेण्याचा एक सक्षम पर्याय आहे. तरी कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी शस्त्र आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news