आरोपी तलाठी बाबूसिंग जाधव याला पोलिसांनी सापळा लावून घेतले ताब्यात

तलाठीला ४ दिवसांची पोलिस कोठडी
jalna arrest accused
आरोपी तलाठी बाबूसिंग जाधव याला पोलिसांनी सापळा लावून घेतले ताब्यातFile Photo
Published on
Updated on

Police have arrested accused Talathi Babusingh Jadhav by laying a trap

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नावावर जाहीर झालेल्या शासकीय अनुदानात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला होता. यातील आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने तलाठी बाबूसिंग जाधव (३६, रा. चौधरी नगर, जालना) याला अटक केली आहे.

jalna arrest accused
आईस्क्रीम विक्रेत्यास लुटणारे तीन आरोपी अखेर जेरबंद

नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाकडून जीआर काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकरी नसलेल्या व्यक्तींची नावे अपलोड करून शासनाची रक्कम लाटल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली. चौकशीत एकूण २४० गावांमध्ये तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपये शासकीय रकमेचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आर्थिक गुन्हे शाखा जालना तपास करीत आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, अटकेतील आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, फरार आर ोपी बाबूसिंग जाधव जालना शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.

jalna arrest accused
Jalna News : मनपाच्या कारभाऱ्यांनी स्वीकारला पदभार

आरोपीला अंबड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक सिद्धार्थ माने, पोलिस निरीक्षक मिथुन युगे, पोलिस अंमलदार शैलेश म्हस्के, गोपाळसिंग कायटे, समाधान तेलंगे, किरण चव्हाण, अंबादास सावळे, गजू भोसले, सागर बावीस्कर, दत्ता बांधुडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुणे, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर आदींनी केली.

आतापर्यंत ३४ आरोपींना अटक

सध्या एकूण ३५ आरोपींना अटक करण्यात आली आली. उर्वरित आर-ोपी व एजंटांचा शोध सुरू आहे. अनुदान घोटाळ्याच्या चौकशीत एकूण २४० गावांमध्ये तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपये शासकीय रकमेचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news