

AI app to help farmers
जालना, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार हे एआय अॅप लाँच केले आहे. हे कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक अॅप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने हे अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अॅप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पदधतींचे मार्गदर्शन करते.
शेतकऱ्यांनी डिजिटल क्रांतीचा भाग व्हावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहिणीनाथ कापसे यांनी केले. त्यांनी पुढे महाविस्तार अॅपमधील चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात.
स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल-टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. अॅपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत.