

Banjara community will cook on one hundred stoves
जालना, पुढारी वृत्तसेवा : बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी विजय चव्हाण यांनी सुरू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी सुरू होते. तथापि शासन आणि प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने मंगळवार (दि.२१) रोजी संध्याकाळी आमवास्येच्या अंधारात बंजारा समाजबांधव उपोषण स्थळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत १०० चुलीवर स्वयंपाक करणार असून कुमारिका मुली पारंपरिक मेरा मागणार आहेत.
मूळ आदिवासी असलेल्या बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटी प्रवर्गात समावेश करावा, सी.पी. बेरार गॅझेट लागू करावे, आर क्षणासाठी बलिदान देणाऱ्या समाज बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्यावी या मागण्यांसाठी विजय चव्हाण यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथा दिवशी जालना जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, बुलढाणा जिल्ह्यांतील समाजबांधवांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
दरम्यान मंगळवारी सायंकाळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंबड चौफली जवळील उपोषण स्थळापासन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चुलीवर स्वयंपाक केला जाणार | असून अनादी काळापासून चालत आलेली मेरा मागण्याची परंपरा येथे होणार आहे.
यात कुमारिका मुली पूर्वज देवी देवतांचे स्मरण करून अमावास्येच्या अंधारात दिवा लावत अज्ञानरूपी अंधार नाहीसा व्हावा, यासाठी अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मेरा मागणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर एसटी आरक्षणात समावेश व्हावा यासाठी गीत गाऊन निवेदन लावले जाणार आहे.