

Agricultural tillage work delayed due to diesel shortage
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात इंधन मिळत नसल्याने ट्रॅक्टर उभे आहेत. यामुळे या भागातील शेतीचे कामे खोळंबल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाच्या वतीने ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे शक्य होत नाही. यावर्षी मुलबक पाणीसाठा असल्याने शेतीचे काम वाढली आहे. सध्या शेती मशागतीच्या कामाना वेग आला आहे. परंतु इंधनच मिळत नसल्याने पुन्हा शेतीत बैलजोडीचा वापर करण्याची वेळ शेतकरी यांच्यावर आली आहे सरकारने शेतकऱ्यांना डिझेल मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मानिसक तहान होत आहे.