Jalna ZP irregularities : कथित अनियमितता प्रकरण; मिनी मंत्रालयात चौकशीचे वारे

पवार गेले सक्तीच्या रजेवर; शालगर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे
Jalna ZP irregularities
Jalna ZP pudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना जिल्हा परिषदेतील कथित अनियमितता प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले पंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्या दोन्ही पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सविता शालगर यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून, त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी दिली.

Jalna ZP irregularities
Parbhani news : जिल्हा परिषदेत नियमबाह्य पदोन्नतीचा फुगा फुटला

संदीप पवार यांच्याकडे असलेला पंचायत विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच, जालना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, लिंबाजी बारगिरे यांच्याकडे जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार आहे. त्यात आता जालना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या पदाचीही जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्या खांद्यावर एकूण तीन विभागांची जबाबदारी आली आहे.

दुसरीकडे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सविता शालगर यांच्या विरोधात रस्ते कामात झालेल्या अनिमितता प्रकरणाची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून, त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. या घडामोडींमुळे जिल्हा परिषदेतील चर्चित प्रकरणात प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jalna ZP irregularities
Kalyan East News | कल्याणात वृक्षवल्ली धोक्याच्या उंबरठ्यावर; बेकायदा वृक्ष तोडीवरून वादाला फुटले तोंड

दरम्यान, लिंबाजी बारगिरे यांच्याकडे समाज कल्याणसह इतर तीन विभागांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यांच्याकडे चार चार पदांचा पदभार असल्याने अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्याने समाज कल्याण विभागाचा पद्भार रमेश घोळवे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंचायत विभाग तुबाकले तर पं.स.चा कारभार बारगिरे यांच्याकडे

जिल्हा परिषद पंचायत विभाग विभागाचे प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पवार यांच्याकडे दोन पदाचा कार्यकभार होता. जालना पंचायत समिती गट विकास अधिकारी पद हे त्यांच्याकडे नियमित होते. मात्र, ते आता सक्तीच्या रजेवर गेल्याने पंचायत विभागाचा पद्भार आता राजेंद्र तुबाकले तर जालना पंचायत समितीची गट विकास अधिकारी पदाचा कारभार लिंबाजी बारगिरे यांच्याकडे आला आहे. लिंबाजी बारगिरे यांच्याकडे पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचा पूर्ण वेळ पदभार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news