Jalna News : वीज बील वसुलीत सुधारणा न झाल्यास कारवाई

महावितरणचे संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार यांचे निर्देश
Jalna News
Jalna News : वीज बील वसुलीत सुधारणा न झाल्यास कारवाईfile photo
Published on: 
Updated on: 

Action to be taken if electricity bill collection does not improve

जालना, पुढारी वृत्तसेवा : ग्राहकसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्याची कामे गतीने करावीत. वीजबिल वसुलीचा उपविभागनिहाय आढावा घेताना असमाधानकारक वसुली असलेल्या ठिकाणी सुधारणा कराव्यात. वसुलीत अपेक्षित सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार यांनी दिला.

Jalna News
पारनेरची दोनशे वर्षांपूर्वीची पुरातन वेस कोसळली !

जालना मंडल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता युवराज जरग (जालना), बीना सावंत (पायाभूत आराखडा) यांच्यासह कार्यकारी अभियंते आणि उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत संचालक तालेवार यांनी शेतीपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा वीजबिल वसुली, स्मार्ट मीटर बसविणे, पायाभूत सुविधांची कामे आणि विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा सविस्तर आढावा घेतला. शेतीपंपांना दिवसा आठ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजवाहिन्यांच्या विलगीकरणाची आवश्यक कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करा.

ग्राहकसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्याची कामे गतीने करावीत. वीजबिल वसुलीचा उपविभागनिहाय आढावा घेताना असमाधानकारक वसुली असलेल्या ठिकाणी सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या वसुलीत अपेक्षित सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Jalna News
Jalna-Chhapra Special train : जालना-छपरा स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढणार

आरडीएसएस, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि पायाभूत आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. कामे करताना कंत्राटदारांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी आणि सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश संचालक तालेवार यांनी दिले.

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० या योजनांचे फायदे ग्राहकांना समजावून सांगा आणि जास्तीत जास्त ग्राहकांच्या अर्जाची नोंदणी करा. तसेच ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या प्रलंबित तक्रारींचा तातडीने निपटारा करा, असे निर्देश तालेवार यांनी दिले.

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

स्मार्ट मीटरमध्ये काही ग्राहक छेडछाड वा फेरफार करत असल्याचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस येत आहेत. अशा प्रकरणांत संबंधितांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करा, अशा सक्त सूचना संचालक तालेवार यांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत केलेल्या कारवाईचा दर आठवड्याला आढावा घेतला जाईल, असेही संचालक तालेवार यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news