

Action taken against sand thieves in Ganga Chincholi; 22 lakh worth of goods seized
जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील गंगा चिंचोली येथील गोदावरी नदीपात्रातून वाळू चोरी करणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाई करून गोंदी पोलिसांनी ट्रॅक्टर लोडर, चार ट्रॅक्टर व एक बुलेट असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
गोंदी पोलिस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक बालाजी पद्मणे, जमादार केंद्रे, हजारे, पोलिस कर्मचारी सिद्दीकी, भोजने, हवाळे, शेख, काळे यांनी गंगा चिंचोली शिवारात गोदावरी नदीपात्रात काही इसम ट्रॅक्टर लोडरच्या साह्याने अवैध वाळूचे उत्खनन करून चोरटी वाहतूक करत असल्याचे समजल्याने दोन पंचासमक्ष गंगा चिंचोली येथील गाव शिवारात कच्या रस्त्याने सहा ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर लोडर पकडले.
यावेळी बाकीचे ट्रॅक्टर पळून गेले. पोलिसांनी ट्रॅक्टर लोडर जप्त करून ते गोंदी पोलिस स्टेशन येथे लावले. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुध्द गोंदी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहागड येथील गोदावरी नदीपत्रात काही लोक केणीच्या मदतीने वाळू काढत असल्याची माहिती समजल्यावर पोलिसांनी कारवाई केली.
यावेळी पोलिसांना पाहून वाळूमफिया ट्रॅक्टर केणीसह ते पळून गेले. घटनास्थळावरून एक बुलेट पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाया पाषलिस अधीक्षक, अजय कुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबड विशाल खांबे, पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक बालाजी पद्मणे करीत आहेत.
पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे पोलिस कोठडीत असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.