

Action taken against 519 ticketless passengers on trains
जालना, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ५१९ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत भाडे व दंडापोटी एकूण २ लाख ५३ हजार १०५ रुपयांची वसुली करण्यात आली. दि. २० जुलै रोजी पार पडलेल्या या विशेष मोहिमेत ३१ स्क्वॉड तिकीट तपासणीस (टीटीई) सहभागी झाले होते. त्यांनी सचखंड एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, नांदिग्राम एक्स्प्रेस, पनवेल एक्स्प्रेस, हडपसर एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, काचेगुडा एक्स्प्रेस, रायचूर एक्स्प्रेससह २७ महत्त्वाच्या गाड्यांची सखोल तपासणी केली.
तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवासाच्या २८५ प्रकरणांतून २ लाख २ हजार ८६५ रुपये, अनियमित प्रवासाच्या १७ प्रकरणांतून ११ हजार ७९० रुपये, तर बुक न केलेल्या सामानाच्या २१७ प्रकरणांतून ३८ हजार १०५ रुपये दंड वसूल करण्यात आला.