Jalna News : शाळा, महाविद्यालय परिसरात अमली पदार्थ प्रतिबंधासाठी कारवाई करावी

अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठकीत सूचना
Jalna News
Jalna News : शाळा, महाविद्यालय परिसरात अमली पदार्थ प्रतिबंधासाठी कारवाई करावीfile photo
Published on: 
Updated on: 

Action should be taken to prevent the use of narcotics in the vicinity of schools and colleges

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच अमली पदार्थांचे सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

Jalna News
Jalna Drought Inspection | केंद्रीय पथकाकडून जामखेडमध्ये दुष्काळाची पाहणी

कार्यालयात जिल्हाधिकारी आयोजित जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक ज्ञानेश्वरी आहेर, उपविभागीय अधिकारी रामदास दौड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सहायक आयुक्त जीवन जाधव, सीजीएसटी अधीक्षक आनंद काकणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, पोलीस निरिक्षक पंकज जाधव यांची उपस्थिती होती. तर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हे ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते.

अमली पदार्थांची उपलब्धता, विक्री

व वाहतूक रोखण्यासाठी पोलिस, महसूल, कृषी, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण या विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

Jalna News
Jalna News : मजुरांना गावातच तत्काळ कामे उपलब्ध करून द्या : जिल्हाधिकारी

शाळा शेजारील टपरींची माहिती संकलित करा

शाळा-महाविद्यालयांच्या शेजारील टपरी-दुकानामार्फत अमली पदार्थांची विक्री किंवा तस्करी करणाऱ्या व्यक्ती व घटकांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. नागरिकांनीही अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराबाबत प्रशासनाला माहिती देऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील औषधी दुकानांची नियमित तपासणी करावी. प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी. शाळा महाविद्यालय शेजारील टपऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून अमली पदाथाची विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी. जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही याची सर्व कृषी विभागाने दक्षता घ्यावी. खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करून, दोषींवर कठोर कारवाई करावी.
- पोलिस अधीक्षक तेगबिर सिंग संधू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news