Jalna Drought Inspection | केंद्रीय पथकाकडून जामखेडमध्ये दुष्काळाची पाहणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
Central Government Drought Inspection
केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने झुंजर यांच्या शेताला भेट देऊन पाहणी केलीPudhari
Published on: 
Updated on: 

Central Government Drought Inspection

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड परिसरातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने शुक्रवारी (दि. ९) सकाळी ११.३० वाजता झुंजर यांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली.

पथकात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल, महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता.

Central Government Drought Inspection
Jalna News | जामखेड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारावर अखेर कारवाईचा बडगा

पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला असून उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि आर्थिक अडचणी पथकासमोर मांडल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून तातडीने भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पाहणीदरम्यान परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची वस्तुस्थिती पथकाच्या निदर्शनास आणून दिली. पाहणीनंतर तातडीने पंचनामे करून नुकसानीची ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

“पाहणी झाली; आता मदतीची प्रतीक्षा नको. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळायलाच हवी,” अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news