

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरात अल्पवयीन मुले ५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालवितांना दिसल्यास आशा मुलांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार असा इशारा शहर वाहतुक शाखचे पोलिस निीरक्षक जनार्धन शेवाळे यांनी दिला आहे.
शहरात मोठ्या संख्येने पालक अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहने चालविण्यास देत आहेत. शाळा, कोचींग कलास भरतांना व सुटण्याच्या वेळेस अल्पवयीन मुले परवाना नसतांना दुचाकी वाहने चालवित आहेत.
ही बाब संपुर्णपणे बेजबाबदारपणाची व बेकायदेशिर असुन अल्पवयीन मुलांनी वाहतुक नियमांचे उल्लघन केल्यास पालकांना दोषी धरले जाणार आहे. या प्रकरणी पालकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलो ५० सी सी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालवितांना आढळल्यास २५ हजाराचा दंड होउ शकतो. तसेच चालक-मालक व पालकांना तीन वर्षापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा देखील कायद्यात नमुद आहे. अपघात झाल्यास खीरपलश उश्ररळा देखील नाकारला जातो. गुन्हे दाखल झाल्यास संबधित मुलांना कोणत्याही प्रकारची नोकरी, पासपोर्ट मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. तसेच दंडात्मक कारवाई झाल्यास वयाच्या २५ वर्षापर्यंत संबंधित मुला-मुलींना वाहण चालविण्याचा परवाना मिळणार नाही किंवा एक वर्षापर्यंतची वाहन नोंदणी रदद केली जाऊ शकते. याची सर्व पालकांनी गंभीर्यपूर्वक नोंद घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
शाळा व महाविद्यातलयातील शिक्षकांनी अल्पवयीन मुलांना परवाण्याशिवाय दुचाकी वाहन चालवु नये या बाबत समुपदेशन करावे. पालकांनीही या बाबत काळजी घेण्याची गरज आहे.