Ambad petrol diesel shortage : अवैध 100 लिटर डिझेल जप्त

तहसील प्रशासनाचे अवैध डिझेल साठ्यावर छापे
Ambad petrol diesel shortage
अंबड ः एका किराणा दुकानातून जप्त करण्यात आलेले डिझेलसह अधिकारी दिसत आहे.pudhari photo
Published on
Updated on

अंबड : शहरासह तालुक्यात पेट्रोल डिझेलची टंचाई भासत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला पेट्रोल डिझेलचा साठा होऊ देऊ नये ! झाल्यास तात्काळ कार्यवाही करावी. या आदेशान्वये अंबड तालुक्यामध्ये अवैध रित्या पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांनी अलर्ट मोडवर येऊन डिझेल पेट्रोलचा साठा करणाऱ्या वर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान तहसील प्रशासनाने 23 मे पासून धडक कारवाईला धडाकेबाज सुरुवात केली असून तहसीलदार विजय चव्हाण आणि तालुका पुरवठा अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून तालुक्यातून एकूण 100 लिटर अवैध डिझेल जप्त केले आहे.

Ambad petrol diesel shortage
Bhoom petrol diesel shortage : भूममध्ये डिझेल-पेट्रोल टंचाई तीव्र

दरम्यान तालुक्यात काही ठिकाणी विनापरवाना व अवैध पद्धतीने इंधनाचा साठा करून त्याची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल व पुरवठा विभागाने तातडीने पथके तयार तपासणी मोहीम राबवून अंबड तालुक्यातील कानडगाव येथील स्वामी समर्थ किराणा दुकान तपासणी दरम्यान 10 लिटर अवैध डिझेल मिळून आले.

अर्जुन झेरॉक्स अँड मल्टि सर्विसेस , चिंचखेड, या ठिकाणी छापा टाकून 40 लिटर डिझेल जप्त करण्यात आले. स्वामी समर्थ नाश्ता सेंटर शहापूर, या हॉटेलवर केलेल्या कारवाईत सर्वाधिक 50 लिटर अवैध डिझेल साठा छापा टाकून जप्त करून हस्तगत करण्यात आले असून संबंधितांवर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत अंबड तहसील प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

Ambad petrol diesel shortage
Vidarbha Diesel Shortage: डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ; 80 किमी दूरून इंधन आणण्याची वेळ, खरीप हंगामाआधी शेतकरी संकटात

अवैध विक्रेत्यांना प्रशासनाचा इशारा अशा प्रकारे विनापरवाना आणि असुरक्षित रित्या पेट्रोल-डिझेल सारख्या ज्वलनशील पदार्थांचा साठा करणे हा गंभीर गुन्हा असून, यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.“अंबड तालुक्यात अवैध रित्या इंधन साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. आज झालेली कारवाई ही केवळ सुरुवात असून, तालुक्यात ही धडक मोहीम आणि कारवाई यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहील.“

विजय चव्हाण तहसीलदार, अंबड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news