Jalna News : खडकाळ जमिनीत मेहनतीने फुलवली झेंडूची बाग

दोन एकरातून लाखांचे उत्पन्न, दुष्काळावर मात, झेंडूच्या फुलांनी दिली साथ
Jalna News
Jalna News : खडकाळ जमिनीत मेहनतीने फुलवली झेंडूची बागfile photo
Published on: 
Updated on: 

A marigold garden cultivated through hard work on rocky land

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाने दगा दिल्याने दुष्काळाचे भीषण संकट ओढवले असून खरीप हंगामातील उभी पिके डोळ्यांदेखत करपून गेली असताना खडकाळ जमिनीत हजारो रुपये खर्च करून शेतात झेंडूची फुले फुलविले आहे. उत्पन्न घेऊन दुष्काळावर मात केली आहे.

Jalna News
Crop Damage Assessments : ९० टक्के पीक पंचनामे पूर्ण; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये !

भोकरदन तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी समजले जाणारे मिरचीचे पीक पूर्णपणे वाया गेले. मात्र, अशा अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीतही आन्वा येथील शेतकऱ्यांनी संकटापुढे हात टेकण्याऐवजी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले. मिरचीचे पीक उपटून त्याच मल्चिंग आणि ठिबक सिंचनावर झेंडूची लागवड करत आन्वा येथील शेतकरी काशिनाथ काळे यांनी अवघ्या दोन एकरांतून पहिल्याच तोड्यात १५० क्विंटल फुलांचे विक्रमी उत्पादन घेत लाखो रुपयांची कमाई केली आहे.

पावसाअभावी शेतातील विहिरींनी तळ गाठल्याने मिरचीचे पीक जळून गेले होते. लागवडीचा खर्चही निघणे अशक्य झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र येथील प्रगतशील शेतकरी काळे यांनी शेतजमीन पडीक ठेवण्याऐवजी जलद येणाऱ्या पर्यायी पिकाचा विचार केला. मिरचीसाठी शेतात आधीच अंथरलेले मल्चिंग पेपर आणि ठिबक नळ्यांचा पुनर्वापर करत त्यांनी दोन एकर क्षेत्रात पिवळ्या व लाल रंगाच्या झेंडूची रोपे लावली.

Jalna News
Jalna News : तलावाच्या तळाला पडल्या भेगा, शेतकऱ्यांच्या स्वप्नांना गेला तडा

केवळ शेततळ्यात साठवून ठेवलेल्या मर्यादित पाण्याचा थेंब अन् थेंब काटकसरीने वापरून त्यांनी हा मळा जोमाने फुलवला दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी निर्माण झाली होती. १८ ऑक्टोबर रोजी शेतात फुलांची तोडणी करण्यात आली. पहिल्याच तोड्यात तब्बल १५० क्विंटल फुलांचे भरघोस उत्पादन निघाले.

दुष्काळामुळे बाजारात फुलांची आवक कमी असल्याने थेट नागपूर येथे कन्टेनेर भरून विक्री नेलेत आहे. सध्या प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने संपूर्ण फुलांची खरेदी केली. अवघ्या ५० हजार रुपयांच्या भांडवली खर्चात पहिल्याच तोड्यातून लाखो रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले, ज्यामुळे मिरचीच्या नुकसानीतून ते पूर्णपणे सावरले आहे.
- काशिनाथ काळे, शेतकरी आन्वा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news