Jalna News : तलावाच्या तळाला पडल्या भेगा, शेतकऱ्यांच्या स्वप्नांना गेला तडा

घनसावंगी : १३९.६ हेक्टर क्षेत्राचा तलाव आटला; पिके करपली, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
Jalna News
Jalna News : तलावाच्या तळाला पडल्या भेगा, शेतकऱ्यांच्या स्वप्नांना गेला तडाfile photo
Published on: 
Updated on: 

Cracks have appeared on the lake bed, shattering the dreams of the farmers

अविनाश घोगरे

घनसावंगी : पावसाची ओढ, आटलेल्या विहिरी-बोअरवेल आणि आता लघुतलावही पूर्णपणे कोरडा! मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील तलावाचा तळ उघडा पडल्याने परिसरातील सुमारे ६०० हेक्टर शेतीसमोर पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. १३९.६ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या तलावावर परिसरातील शेती आणि पशुधनाच्या पाण्याच्या गरजा अवलंबून असताना, तलाव आटल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींत मोठी भर पडली आहे. पाण्याअभावी पिके करपण्याच्या मार्गावर असून, जनावरांची तहान भागवायची कशी, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.

Jalna News
Kamakshi Devi Temple Road : शंभू महादेव फाटा - कामाक्षी देवी रस्ता करा

यंदा पावसाने पुरेशी साथ न दिल्याने परिसरातील जलस्रोतांवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके सुकू लागली असून, शेतात केलेली मेहनत आणि पेरणीपासून मशागतीपर्यंत झालेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी हजारो रुपये खर्च करूनही हाती किती उत्पादन पडेल, याची शाश्वती राहिलेली नाही.

मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील हा तलाव परिसरासाठी महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. तलावात पाणीसाठा असताना परिसरातील शेतीला त्याचा आधार मिळत होता. मात्र, आता तलावातील पाणी पूर्णपणे संपल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. तलावाच्या तळातील उघडी पडलेली माती आणि जमिनीला पडलेल्या भेगा दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य घनसावंगी : मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील हा तलाव कोरडाठाक पडला आहे.

Jalna News
Jalna News : बाजार समितीत तुरीला १०,४५० रुपये भाव

अधोरेखित करीत आहेत. एकेकाळी पाण्याचा आधार देणाऱ्या तलावाची ही अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन मिळाले नाही, तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची आणि आगामी हंगामाची तयारी कशी करायची, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. पावसाची प्रतीक्षा कायम असताना दुसरीकडे शेतीवरील खर्चाचा भार वाढत आहे.

त्यामुळे केवळ पावसाचीच नव्हे, तर शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचीही शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. दुष्काळाचे संकट आता पिकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. तलाव कोरडा पडल्याने पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न बनला आहे. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने जनावरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पशुपालकांना कसरत करावी लागत आहे. शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा धूसर होत असताना जनावरांच्या चारा-पाण्याचा खर्च मात्र कायम आहे. पिके वाचविण्याची धडपड करावी की पशुधनाची तहान भागविण्यासाठी धावपळ करावी, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.

या परिस्थितीत प्रशासनाने मच्छिंद्रनाथ चिंचोली परिसरातील पाणीटंचाईची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन, पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता आणि चारा व्यवस्थेबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करून पंचनामे करावेत.

तलावात पाणी असताना आमच्या जनावरांचीही तहान भागायची. आज तलावाचा तळ उघडा पडला आहे. शेतात पिके जगविण्याची धडपड सुरू आहेच; पण घरच्या जनावरांच्या पाण्याची चिंता त्याहून मोठी वाटते. मुक्या जनावरांना पाण्यासाठी कुठे घेऊन जायचे, हा प्रश्न रोज सतावतो. दुष्काळ आणखी वाढला तर शेतीसोबत पशुधन वाचविण्याचेही मोठे संकट भे राहील.
- अशोक घोगरे, शेतकरी, मच्छिंद्रनाथ चिंचोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news