

A ghat featuring a walking track will be constructed in the Seena area
जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील सीना नदी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या सीना नदी परिसर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवार दि. ५ रोजी जालना महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पोलाद स्टीलचे सतीश अग्रवाल यांनी कंपनीच्या सीएसआर निधीतून २१ लाखांची देणगी दिली आहे. या निधीतून परिसरात वृक्षारोपण, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, नदीकाठी घाटाची उभारणी तसेच अन्य आवश्यक नागरी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे सीना नदी परिसराचे सौंदर्गीकरण होण्यासह नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. प्रशांत महाजन, प्रकल्पप्रमुख रो. सुरेश मगरे, रो. रमेश मगरे, रो. वर्षा पिती, रो. प्रमोद झांजरी, रो. सुनील रायठठ्ठा, रो. दीपक बगडिया, रो. विनोद मोतीवाला, रो. राजेश बजाज यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी संख्येने उपस्थित होते.
विकास प्रकल्पाला सीएसआर निधीचे बळ
पोलाद स्टीलचे सतीश अग्रवाल यांनी कंपनीच्या सीएसआर निधीतून २१ लाखांची देणगी दिली आहे. या निधीतून परिसरात वृक्षारोपण, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, नदीकाठी घाटाची उभारणी तसेच अन्य आवश्यक नागरी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.