

A fun education fair for the children of sugarcane workers
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्हा परिषद व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर याच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्हातील परतूर घनसावंगी तालुक्यातील ३० गावांत उसतोड कामगार मुलासाठी गावातील शाळेत गोडी लागावी व गावात राहून शिक्षण घ्यावे यासाठी परतूर घनसावंगी तालुक्यातील ३० गावांत स्थलांतरित कुटुंबातील मुलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत आहे.
नवीन गोष्टी तयार करणे किंवा विचार करणे, मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे, ज्यामुळे त्यांची सर्जनशीलता वाढते. या हेतुने परतूर घनसावंगी तालुक्यातील प्रकल्प गावातील ऊसतोड मुलासाठी कार्यक्रम आखणी करण्यात आली. या बालकांना पोषण मिळावे म्हणून परसबाग किट वाटप करण्यात येत आहे. या संस्थेचे प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले, प्रकल्प संपर्क प्रमुख भाऊसाहेब गुंजाळ, प्रकल्प व्यवस्थापक अश्वजित जाधव याच्या मार्गदर्शनखाली जिल्ह्यात काम चालू आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमास जिल्हा समन्वयक एकनाथ राऊत, गाव स्वयंसेवक राजेश वाघमारे, सुरेखा वाघमारे, दुर्गा नाडे, आकाश चौगुले, योगेश आहे, महादेव खरात हे उपस्थित होते. परतूर घनसावंगी तालुक्यातील ३० गावांत उसतोड कामगार मुलांतील बिविध कलागुणांना वाव देणे, चित्र काढणे, आरोग्य पोषण व शिक्षणाबाबत विविध प्रश्न समस्या चित्रातून व्यक्त होणे, स्थलांतरित कुटुंबामधील मागे रहिलेल्या बालकासाठी भावनिक मानसिक आधार देणे, शैक्षणिक सहित्य व इतर कार्यक्रमामुळे आधार मिळत आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटी व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.