Maratha Reservation : खा. हरिभाऊ राठोड यांचा जरांगे- पाटलांना पाठिंबा

Maratha Reservation : खा. हरिभाऊ राठोड यांचा जरांगे- पाटलांना पाठिंबा

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज (दि.११) दुसरा दिवस आहे. आज त्यांची भेट घेण्यासाठी माजी खा. हरिभाऊ राठोड आले होते. मात्र, जरांगे -पाटील कोणाशीही बोलत नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, तरीही माझा जरांगे-पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच  जरांगे- पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारने २ ते ३ दिवसांत निर्णय घ्यावा. मी जरांगे पाटलांच्या पाठीशी असून माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, असेही माजी खा. राठोड यावेळी म्हणाले. अंतरवालीत जरांगेंची भेट घेण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले की, मी येवल्यावरून आलो आहे. ओबीसी आणि मराठा समाजात सलोख्यासाठी येवल्यात आज संयुक्त भाईचारा परिषद आयोजित केली होती. मात्र तिथे आमचे बोर्ड फडले गेले. आम्हाला तिथे विरोध झाला तरी आम्ही तिथे पत्रकार परिषद घेऊन मराठा -ओबीसी समाजाची भूमिका मांडली. तसेच आज अंतरवालीत जरांगे -पाटलांची भेट घेण्यासाठी व आरोग्याची चौकशी करण्यासाठी आलो होतो. त्यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आताच्या आरक्षणाचं विभाजन करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल. मराठा समाज मागास असून मराठा समाजाला आरक्षण द्यायला काही हरकत नाही, अशी शिफारस मागासवर्ग आयोग करेल तसा रिपोर्ट मागासवर्ग आयोग दोन तीन दिवसात देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news