

3167 students from the district gave the 'RTS' exam
जालना, पुढारी वृत्तसेवा : डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व फाउंडेशन द्वारे आयोजित करण्यात आलेली रॅशनल टॅलेंट सर्च (आरटीएस) परीक्षा जालना जिल्ह्यातील सुमारे ३१६७विद्यार्थ्यांनी दिली. या परीक्षेला महाराष्ट्र व गोवा राज्यात प्रचड प्रतिसाद मिळाला. राज्यातील १२० परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली. ६१७ पर्यवेक्षक व २४ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पप्पू पाटील भोयर, लक्ष्मण नेव्हल, दिपाली खलसे, भास्कर शिंदे, सतीश काळे, कृष्णा वाघ, विठ्ठल घायाळ, अनंत मिटकरी, दिपक चव्हाण, चक्रधर जाधव, रमालक्ष्मी रेड्डी, गजानन देशमुख, वंदना दुबे आदींनी परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील सहा केंद्रांवर झाली परीक्षा
सेंट मेरीज हायस्कूल, जालना, विश्वनाथ विद्यालय, तळणी ता. मंठा, गणपती एज्युकेशनल सोसायटी, राजूर ता. भोकरदन जि. जालना, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, भोकरदन, स्वामी विवेकानंद विद्यालय, बूटखेडा जालना, जि.प. प्रशाला, बूटखेडा- जाफ्राबाद अशा एकूण सहा परीक्षा केंद्रावर अतिशय नियोजनबद्ध व शिस्तीत आज हि परीक्षा पार पडली.