

11 percent water storage in Dhamana Dam, heavy rains needed
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा: भोकरदन तालुक्यातील सेलुद येथील धामणा धरणातून परिसरातील बारा गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. ऑगस्ट महिन्यात धरणात ११ टक्के जलसाठा आहे. धरण परिसरात मोठ्या पावसाची गरज आहे.
सेलूद येथील धामणा धरण परिसरात गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने धामणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात धरणात तब्बल ११ टक्के एवढा जलसाठा असल्याने परिसरातील बडोद तांगडा, जळकी बाजार, आन्या, जळगाव सपकाळ, वालसांगवी, हिसोडा खुर्द, हिसोडा बुद्रुक, सेलुद, पोखरी, चावडा, खुपटा, लेहा या गावारील पाणी संकट यंदा टळले आहे.
दोन वर्षांपूर्वी धामणा धरण कोरडे पडल्याने या बारा गावांमधे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या बारा गावांतील पाणीप्रश्न गंभीर बनला होता. गेल्या वर्षापासून धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक राहात असल्याने बारा गावांतील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला नाही. धामणा धरणातील पाणी पातळीत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने घट होऊ लागल्याने धरण परिसरात मोठे पाऊस न पडल्यास बारा गावांतील पाणीप्रश्न गंभीर बनण्याची शकयता आहे.
धामणा धरणात सध्या ११ टक्के पाणीसाठा आहे. यंदा धरणात मुबलक पाणीसाठा नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभणार आहे.