वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : शहागड येथील पैठण रोडवरील वीट भट्टीवर झालेल्या खून प्रकणातील फरार आरोपीला गोंदी पोलिसांनी अखेर श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले आहे. घटना घडल्यानंतर चोवीस तासात गोंदी पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेऊन अटक केली. दिलीप भारस्कर असे त्याचे नाव आहे.
अंबड तालुक्यातील शहागड जिनींग जवळील वीटभट्टीवरील कामगार पती-पत्नीत घरगुती कारणावरून भांडण झाले. भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव केला. यात पत्नी ज्योती भारस्कर हिचा जागीच मृत्यू झाला होता. पत्नीचा खून करून पती दिलीप भारस्कर हा फरार झाला होता. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सदर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्याकडे देण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपसा दरम्यान पोलिस उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील व सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत, गोपाल दिलवाले, सुशील कारंडे, पठाडे यांनी तपासाची चक्रे फिरवून श्रीरामपूर येथून संशयित आरोपी दिलीप याला काल मध्यरात्री २ वाजता ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :