Aundha Nagnath Accident | औंढा नागनाथ तालुक्यात पिकअप उलटून तरुणाचा मृत्यू; संशयास्पद अपघाताबाबत चौकशी

जलाल दाबा येथे अपघात
 Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

Pickup Vehicle Accident Hingoli

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील जलाल दाबा येथे गुरुवारी (दि.१४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिकअप वाहन उलटून झालेल्या अपघातात रमेश मारुती खोकले (वय३०, रा. जलाल दाबा) यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पुढील उपचारासाठी त्यांना औंढा नागनाथ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर रमेश खोकले यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर जलाल दाबा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 Accident News
Hingoli News : हिंगोलीत उद्धव सेनेला संघटन बांधणीचा विसर !

मृत रमेश खोकले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शेख खुद्दूस यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

 Accident News
Hingoli News | हट्ट येथील जि.प. शाळेतील रिक्त पदे भरली; विद्यार्थी-पालकांच्या धडक मोर्चाला यश

रमेश खोकले यांचा नेमका अपघात कसा झाला, त्यांना कोणत्या वाहनाने धडक दिली की अन्य काही प्रकार घडला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या घटनेचा पुढील तपास औंढा नागनाथ पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news