Child sexual abuse case : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गर्भवती राहिल्यानंतर लग्नास नकार, तरुणावर औंढा ठाण्यात गुन्हा दाखल
Minor girl rape case
Minor girl rape casePudhari
Published on
Updated on

हिंगोली : औंढा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले त्यानंतर मुलगी गर्भवती राहिल्याने लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर बुधवारी सकाळी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी तरुणाच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी औंढा नागनाथ तालुक्यात एका शाळेत शिक्षणासाठी होती. यावेळी अमोल माहोरे याने त्या मुलीसोबत प्रेमसंबंध तयार केले. त्यानंतर मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. यावेळी त्याने मुलीस पुणे येथे नेऊन त्या ठिकाणी अत्याचार केला. एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत त्याने मुलीवर अत्याचार केले.

Minor girl rape case
Hingoli Shivjayanti Mahotsav : सहा जणांना शिवछत्रपती गौरव पुरस्कार जाहीर

या प्रकारामुळे मुलगी गर्भवती राहिली. सदर मुलगी गर्भवती राहिल्याचे लक्षात आल्यानंतर अमोल याने त्या मुलीस तुझ्या पोटातील बाळ पाडून टाक अन्यथा तुझ्या सोबत लग्न करणार नाही अशी धमकी दिली. मात्र त्या मुलीने गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतर अमोल यानेही लग्नास नकार दिला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या मुलीने सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने मुलीस सोबत घेत थेट औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठले.

Minor girl rape case
Jalna News : तालुक्यात रसवंतीचे घुंगरू वाजू लागले

यावेळी त्या मुलीने दिलेल्य तक्रारीवरून पोलिसांनी अमोल माहोने याच्याविरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

  • सहायक पोलिस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक दत्ता कानगुले पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपी तरुणाच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news