Hingoli Crime : शिक्षिकेला शिवीगाळ करून धमकी

प्राचार्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल
Teacher harassment allegation
शिक्षिकेला शिवीगाळ करून धमकी pudhari photo
Published on
Updated on

वसमत ः येथील केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षिकेला शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या आरोपावरून प्राचार्य पी. के. जगताप याच्या विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता केंब्रीज महाविद्यालयात नव्याने वादाला तोंड फुटले आहे.

येथील केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बाराबीचे परीक्षा केंद्र आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून विद्यार्थ्यांना उत्तरे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार परीक्षा केंद्रावरील विभाग प्रमुखांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर दहा ते पंधरा मिनीट सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले.

Teacher harassment allegation
Bori Parbhani tension | बोरीत पोलिसांविरोधात नागरिकांचा एल्गार, कडकडीत बंद ; ठाण्यात मांडला ठिय्या

याप्रकरणी अनोळखी शिक्षकावर सीसीटीव्ही बंद करून गाईडमधून उत्तरे सांगितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालय चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान, याच महाविद्यालयातील एका शिक्षिकेची हयातनगर येथील विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयात बाह्य परिक्षक म्हणून बोर्डाकडूनच नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार विश्वशांती महाविद्यालयाने केंब्रीज महाविद्यालयास संबंधित शिक्षीकेचे बाह्य परीक्षक म्हणून नियु्‌‍क्तीचे पत्र पाठविले होते. मात्र प्राचार्य जगताप यांनी सदर पत्र स्विकारले नाही.

या संदर्भात संबंधित शिक्षीकेने प्राचार्य जगताप यांच्याकडे जाऊन बाह्य परिक्षक म्हणून नियुक्तीचे पत्र का स्विकारले नाही अशी विचारणा केली. मात्र यावेळी प्राचार्य जगताप याने शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप शिक्षीकेने केला आहे.

Teacher harassment allegation
Hyva truck dust pollution issue : सुसाट हायवा; ना ताडपत्री ना गतिवर नियंत्रण!
  • या प्रकरणी त्या शिक्षिकेच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात प्राचार्य पी. के. जगताप विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जमादार शेख नय्यर पुढील तपास करीत आहे. दरम्यान, या घटनेनंतर केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news