Hingoli road quality issue : तीन वर्षांतच महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे

अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे, 1976 कोटी पाण्यात
Hingoli road quality issue,
हिंगोली ः खानापूर चित्ता शिवारात रस्त्याचे खोदकाम करून पॅनल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.pudhari photo
Published on
Updated on

हिंगोली ः वाशिम ते वारंगाफाटा या 76 किमी राष्ट्रीय महामार्गावर खानापूर चित्ता शिवारात रस्त्यावरील संपूर्ण पॅनलच बदलण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी अवघ्या तीन वर्षातच दुरुस्तीचे काम करावे लागत असल्याने उद्घाटन कार्यक्रमात रस्ता गुणवत्तेचेे गोडवे गाणारे लोकप्रतिनिधी चांगलेच तोंडघाशी पडल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून वाशिम ते वारंगाफाटा हा सुमारे 76 किलो मिटरच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले हेोते. या कामांवर सुमारे 1976 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वाशीम ते वारंगाफाटा मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन गतीमान प्रवास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानंतर या रस्ते कामांचे उदघाटन फेब्रुवारी 2023 मध्ये केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

Hingoli road quality issue,
Mumbai Goa highway: नागोठणेनजीक महामार्गाचे काम कासवगतीने; पुलांच्या कामांमुळे वाहतूककोंडी सुरूच

या उदघाटन कार्यक्रमात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या गुणवत्तेचे गोडवे गायले. यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांना देखील खूष करून टाकले. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी देखील कामाचे कौतूक केले होते.

मात्र रस्ते कामाचे उदघाटन झाल्यानंतर अवघ्या एक वर्षातच सिमेंट रस्त्यावर भेगा पडू लागल्या होत्या. त्यानंतर कंत्राटदाराने या भेगा बुजविल्या मात्र आता तर भेगा वाढल्यामुळे चक्क पॅनलच बदलण्याची वेळ आली आहे. हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता शिवारात पुन्हा एकदा रस्ता खोदकाम करून पॅनल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Hingoli road quality issue,
Mumbai Goa National Highway: कामच सुरू नाही, मग रस्ता पूर्ण कसा होणार?

विशेष म्हणजे हे काम देखील संथ गतीने सुरु असल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या अवघ्या तीन वर्षातच होणाऱ्या दुरुस्तीमुळे कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पडले आहे.

  • या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता सदर कामांची दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असून पुढील 10 वर्षापर्यंत त्यांच्याकडूनच दुरुस्ती केली जाणार आहे. यासोबचत आता हा रस्ता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news