हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा; घाबरण्याचे कारण नाही : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

तीन दिवसांचा बफर साठा
Hingoli gas cylinder
हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा; घाबरण्याचे कारण नाही : जिल्हाधिकारी राहुल गुप्ताfile photo
Published on
Updated on

Sufficient stock of gas cylinders in Hingoli district; District Collector Rahul Gupta

हिंगोली : अमेरिका-इराण यांच्यात युद्ध सुरू असले तरीही ‌जिल्ह्यात पुरेसा गँस सिलिंडरचा साठा असून, नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

Hingoli gas cylinder
PM Kisan 22th Installment : १३ मार्चला पीएम-किसानचा २२ वा हप्ता; परभणीत थेट प्रक्षेपणातून शेतकऱ्यांशी पंतप्रधानांचा संवाद

जिल्ह्यातील गॅस पुरवठा स्थिती सध्या पूर्णपणे सामान्य असून नागरिकांनी घाबरून जाण्याची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात एकूण १३ गॅस एजन्सी कार्यरत असून एकूण ३,७४,४७८ ग्राहकांना गॅस पुरवठा केला जात आहे. सध्या ४,४३५ घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा करताना रुग्णालये, वसतिगृहे तसेच इतर शासकीय संस्थांना प्राधान्य दिले जात आहे. तसेच गॅस प्लांटमध्ये घरगुती सिलिंडरचा सुमारे ३ दिवसांचा बफर साठा उपलब्ध आहे. वितरकांकडेही सुमारे दीड दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्याने पुरवठा सुरळीत सुरू आहे.

Hingoli gas cylinder
Beed Crime News : घळाटवाडीत मेंढपाळांवर जीवघेणा हल्ला

सध्याची परिस्थिती पूर्णपणे सामान्य असून नागरिकांनी घाबरून न जाता नियमितपणे गॅसचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news