धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर गोरेगावात विद्यार्थ्यांचा जल्लोष

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा फटाके फोडून आनंदोत्सव
hingoli news
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर गोरेगावात विद्यार्थ्यांचा जल्लोषfile photo
Published on
Updated on

Students cheer in Goregaon after Dharmendra Pradhan's resignation

गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजीत दिपके यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली.

hingoli news
Hingoli Earthquake | हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का, 3.1 रिश्‍टर स्केलची नोंद

या संघर्षामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यापूर्वी हिंगोली येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन, पुतळा जाळण्याचा प्रयत्न तसेच विविध आंदोलनांच्या माध्यमातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला होता.

गोरेगाव येथे झालेल्या आनंदोत्सवात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या संघर्षाला हे यश समर्पित असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे राहुल कावरखे, अमोल जाधव, अमोल एकशिंगे, रामेश्वर कावरखे, अलीम भाई, कोंडबाराव खटके, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

hingoli news
Hingoli road infrastructure issues: कागबन-सारोळा मुख्य रस्त्याची दुरवस्था; चिखलात अडकलेली स्कूल बस विद्यार्थ्यांनी ढकलून काढली बाहेर

संघर्शिवाय न्याय मिळत नाही. विद्यार्थ्यांची एकजुट अन् लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला. हा विजय देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news