Hingoli road infrastructure issues: कागबन-सारोळा मुख्य रस्त्याची दुरवस्था; चिखलात अडकलेली स्कूल बस विद्यार्थ्यांनी ढकलून काढली बाहेर

या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे
Hingoli road infrastructure issues
Hingoli road infrastructure issues
Published on
Updated on

वसमत : तालुक्यातील मौजे कागबन येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी धावणारी स्कूल बस थोरावा-कागबन-सारोळा जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील चिखलात रुतल्याची घटना घडली. रस्त्याची चाळण झाल्याने बसमधील चिमुरड्या विद्यार्थ्यांनाच बसला धक्का मारून ती चिखलातून बाहेर काढावी लागली.

Hingoli road infrastructure issues
Hingoli road quality issue : तीन वर्षांतच महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे

या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. खराब रस्त्यामुळे शाळकरी मुलांसह शेतकरी, कर्मचारी, व्यावसायिक आणि नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Hingoli road infrastructure issues
Hingoli Earthquake | हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का, 3.1 रिश्‍टर स्केलची नोंद

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व उदासीनता व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news