Aadhaar Card Fraud Hingoli | वसमतमध्ये जमीन विक्रीसाठी मुलाकडून फेरफार; वडिलांच्या आधार कार्डवर लावला स्वतःचा फोटो

वसमत दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात परस्पर खरेदी विक्रीचे व्यवहार करणारे एजंट
Aadhaar Card Fraud
Aadhaar Card Fraud File Photo
Published on: 
Updated on: 

Aadhaar Card Fraud Basmat Hingoli

भीमराव बोखार

वसमत : वसमत तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन विकण्यासाठी मुलानेच वडिलांच्या आधार कार्डमध्ये फेरफार करून स्वतःचा फोटो लावल्याचा प्रकार दुय्यम निबंधक कार्यालयात उघड झाला आहे. दुय्यम निबंधक पवन मोरे यांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघड झाला आहे.

याप्रकरणी जमीन विक्री करणारा मुलगा, खरेदी करणारे व साक्षीदार अशा तिघांविरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Aadhaar Card Fraud
Hingoli Crime : चोंडी फाटा येथील पेट्रोल पंपावरील खून प्रकरणातील आरोपींना २६ तासांच्या आत घेतले ताब्यात!

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हातारगाव येथील गट क्रमांक १२/१ मधील दहा आर शेतजमीन विक्रीचे कागदपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात सादर झाले होते. या जमिनीचेमुळ मालक सुदाम नारायण बोखारे (रा. म्हातारगाव) असे असताना त्यांचे पुत्र नामदेव सुदाम बोखारे यांनी स्वतःच मालक असल्याचे भासवण्यासाठी वडिलांच्या आधार कार्डवर वडिलांच्या फोटोऐवजी स्वतःचा फोटो लावून बनावट आधार कार्ड तयार केले होते.

खरेदीदार तयार झाले, व्यवहाराची बोलणी झाली आणि नोंदणीसाठी सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली. ऑनलाईन फोटो आणि दस्तावरील फोटोची पडताळणी करताना दुय्यम निबंधक पवन मोरे यांना संशय आला. त्यांनी आधार कार्डची बारकाईने तपासणी केली असता आधार क्रमांक एकाच व्यक्तीचा पण फोटो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ दस्त नोंदणी प्रक्रिया थांबवून अधिक चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार बनावट आणि फसवणुकीचा असल्याचे समोर आले.

Aadhaar Card Fraud
Hingoli Crime : अवैध सावकारीच्या संशयावरून कळमनुरीत एका घरावर छापा

या प्रकरणात नामदेव सुदाम बोखारे (रा. म्हातारगाव), किरणसिंग रतनसिंग चव्हाण (रा. वसमत), वैभव दत्ता धर्माधिकारी (रा. वसमत) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वसमतमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची खरेदी-विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा असून वडिलांच्या जमिनीचा व्यवहार या सतर्कतेमुळे थांबला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून बनावट कागदपत्रे तयार करणारी आणि जमीन हडपणारी टोळी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news