Hingoli Crime : चोंडी फाटा येथील पेट्रोल पंपावरील खून प्रकरणातील आरोपींना २६ तासांच्या आत घेतले ताब्यात!

स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीची उल्लेखनीय कामगिरी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

वसमत: कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हदिदत इंडियन ऑईल कंपनीच्या मॅनेजर महेश अण्णाराव शेळके, वय ३७ वर्षे, रा. केळव ता. अहमदपूर, जि. लातूर यांचा खून झाल्याची घटना दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी घडली होती. घटनेचे गांर्भीय ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत तत्परतेने आणि कौशल्याने चक्रे फिरवुन अवघ्या २६ तासात खूनाच्या गुन्हयातील ०५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन मा. डॉ. श्रेणिक लोढा, पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी घटनास्थळी स्वतः हजर राहुन पोनि मोहन भोसले, स्थागुशा, हिंगोली यांना गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा जलद गतीने शोध घेऊन श्रावण गंगाराम वाकुडे, रा. बोबडे टाकळी ता.जि. परभणी ह.मु. गोविंदनगर, वसमत, महीला आरोपी लता भ्र. साहेब पांडववीर, रा. नालेगांव ह.मु. हर्षनगर, वसमत, उमेश साहेबराव पांडववीर, रा. नालेगांव ता. औंढा ह.मु. हर्षनगर, वसमत,राहुल उत्तमराव धायजे, रा. हर्षनगर, वसमत, प्रथमेश विक्रम वाघमारे रा. सम्राट कॉलनी, वसमत यांना सदर गुन्हयात ताब्यात घेण्यात आले.

सदरची कार्यवाही डॉ. श्री. श्रेणिक लोढा, पोलीस अधीक्षक, श्री. कमलेश मीना, अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे श्री मोहन भोसले, पोउपनि माधव जिव्हारे, पोह/भुजंग कोकरे, पोना/शिवाजी जालमिरे, पोशि/दत्तात्रय नागरे, पोशि/किशोर सांवत, पोशि/विशाल खंडागळे पोशि/आजम प्यारेवाले, पोशि/मुनिर मुन्नीवाले, पोशि/ज्ञानेश्वर गोरे, पोशि/ हरीभाउ गुंजकर, चापोशि/शंकर हराळ तसेच पोस्टे कुरूंदा येथील सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी व त्यांच्या पथकाने केली आहे.

सदर गुन्हा अत्यंत गंभीर व संवेदनशील असल्याने नमुद गुन्हयातील आरोपीतांना तत्परतेने अटक करणा-या वर नमुद पथकातील अधिकारी व अंमलदारांचे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news