

Social media leads to forgetting about mailboxes
जवळाबाजार : पुढारी वृत्तसेवा
सध्याच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन सुविधा मोठ्याप्रमाणात उपलब्ध होत असल्याने टपाल पेटीचा मात्र सोशल मीडियावर विसर पडत चालला आहे. सोशल मीडियाच्या प्रगतीच्या आधी देशात टपाल सुविधेवर सर्व बाबी अवलंबून होत्या. अनेकजण टपाल पेटीच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांशी संपर्कात असायचे. आयुष्यातील सुख, दु:ख आणि संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी टपालसेवा महत्वाची होती.
आप्त, नातेवाईकही आपल्या हितचिंतकांच्या संपर्कसाठी टपालसेवेवर अवलंबून होते. समोरून निरोप सुध्दा टपाल सुविधावर अवलंबून होता. त्या काळात मोठ्याप्रमाणात गावो-गावी चौका-चौकात मोठ्याप्रमाणात टपाल पेटी बसविण्यात येत होती.
दररोज मोठ्याप्रमाणात टपाल बॅग भरून टपाल पाठवण्यात येत होत्या, पण कालंतराने निरोप पाठवण्यास कुरीयर सेवा सुरू झाली. टपाल माध्यमातून चार ते पाच दिवसात टपाल पोहचल्यावर निरोप येत होता, पण कोरीयर सेवा चोवीस तास टपाल पोहचत होत्या. पण यांत्रिका युगात नवनवीन सेवा सुरू झाल्या.
मोबाईल सेवेमुळेतर संदेशवहनात मोठी प्रगती झाली. नेटवर्किंग माध्यमातून आताचा काळात कोणत्याही प्रकाराचे निरोप काही क्षणातच पोहचविण्याची सुविधा सोशल मीडियावर उपलब्ध झाली आणि आजचा काळात टपाल पेटीत जाऊन टपाल पाठवण्याची सुविधा कमी होण्यास सुरुवात झाली आज सुध्दा फार कमी प्रमाणात टपाल पेटी शहरी भागात तर ग्रामीण भागात एक टपालपेटी सुविधा उपलब्ध होत असून केंद्रीय टपाल विभागाकडून आजच्या काळात सुध्दा मोठ्याप्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यास स्पर्धा लागलेली पहावयास मिळत आहे.
पण आजच्या परिस्थितीत मोठ्याप्रमाणात सोशल मीडियाचा वापर करण्यात येत असल्याने टपालचे जवळपास ८० टक्के काम सोशल मीडियावर होत आहे. एकंदरीतच आजचा धकाधकीचा जीवनात मोठ्याप्रमाणात वेळ बचत होत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या मोठ्या प्रमाणातील आणि सहज वापरामुळे टपाल पेटीचा वापर कमी तर झाला मात्र नव्या पिढीला तर अशी टपाल पेटी असायची असे सांगण्याची वेळ येणार आहे.