Hingoli Crime : सेनगावमध्ये वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला

दगडाने मारून जखमी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
Hingoli Crime News
सेनगाव पोलिस ठाणेpudhari photo
Published on
Updated on

सेनगाव : सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गणेशपूर ते हत्ता रोडवर वाहनांची तपासणी करणाऱ्या जमादारावर हल्ला करून जखमी करणाऱ्या चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने पथके स्थापन करून दोघांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

जिल्हाभरात अवैध गौण खनिज वाहतूक तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाभरात वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली जात असून यामध्ये वाहनांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, सेनगाव पोलिस ठाण्याचे जमादार जीवन मस्के हे त्यांच्या पथकासह रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गणेशपूर ते हत्ता मार्गावर वाहनांची तपासणी करीत होते.

Hingoli Crime News
Sindhudurg News : बनावट सह्याप्रकरणी पाच ठेकेदारांविरुद्ध गुन्हा

यावेळी पोलिसांनी एक पिकअप वाहन थांबवून चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी गजानन चव्हाण, सुदाम चव्हाण, राजेश चव्हाण, वामन चव्हाण (सर्व रा. गणेश नगर तांडा ता. जिंतूर जि. परभणी) यांनी पोलिसांच्या प्रश्नाला उत्तरे देण्या ऐवजी जमादार मस्के यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

यावेळी चौघांनी मिळून जमादार मस्के यांना मारहाण केली तसेच दगडाने मारून जखमी केले. यासोबतच जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत मस्के जखमी झाले. या प्रकरणी मस्के यांच्या तक्रारीवरून वरील चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.

Hingoli Crime News
Nandurbar Crime | गो- तस्करांना पकडल्यानंतर दोन जमाव भिडले; दगडफेक करीत वाहन फोडले, प्राणघातक हल्ल्यात ५ जण गंभीर जखमी
  • या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण, जी. एस. पाचपुते यांनी तातडीने आरोपींचा शोध घेतला. यामध्ये सुदाम व राजेश यांना अटक केली असून उर्वरित दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news