Sand Mafia :४ बोटींची होळी; ११ हायवा अन् ४ जेसीबी जप्त

कयाधू नदीत महसुलची कारवाई, वाळूमाफियांना दणका
hingoli news
Sand MafiaPudhari
Published on
Updated on

Sand Mafia: 4 Boats Set Ablaze; 11 Hyvas and 4 JCBs Seized

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील पिंपरी शिवारामध्ये कयाधू नदीच्या पात्रातून बोटीद्वारे होणारा वाळू उपसा थांबवून महसूल विभागाच्या पथकाने चार बोटी जाळून नष्ट केल्या. तसेच ११ हायवा व ४ जेसीबी असा सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महसूल पथकाच्या या कामगिरीने बोटीद्वारे वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

hingoli news
Illegal Sand Mining | सातेफळ नदीपात्रातील अवैध रेती उपसासाठीचे तराफे जाळले; ४० ब्रास वाळूचा साठा जप्त

कयाधू नदी पात्रात बोटीचा वापर करुन वाळू उपसा केला जात असल्याच्या तक्रारी तहसीलकडे आल्या होत्या. या तक्रारीनंतर सहायक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना, मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे, आनंद काकडे, प्रेम चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी साईनाथ वानखेडे, महेश गळाकाटू, प्रसन्न देशमुख, विशाल पतंगे, एकनाथ कदम, महसूल सेवक संतोष मुधोळ, आकाश पुलाते, चंद्रकांत पाटे यांच्या पथकाने शुक्रवारी पिंपरी बुद्रुक परिसरात भेट देऊन पाहणी केली.

hingoli news
Sand Smugglers : तक्रारीनंतर वाळू तस्करांविरुद्ध कारवाई

या पथकाच्या पाहणीमध्ये बोटीद्वारे वाळूचा उपसा होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या पथकाने चार बोटी जप्त करून जाळून नष्ट केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news