जवळाबाजार (हिंगोली) – पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील जवळा बाजार परिसरात जवळपास २५ दिवसानंतर आज वरुण राजाचे आगमन झाले आहे. परिसरातील खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. यामुळे शेतकरी बांधव हातबल झाले होते. अखेर दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान जवळा बाजार परिसरात वरूण राजाचे आगमन झाले तर दिनांक ७ सप्टेंबर रोजी परिसरात ढगाळ वातावरणात सकाळपासूनच परिसरात रिमझिम पावसास सुरूवात झाली.
जवळपास २५ दिवसानंतर वरूण राजाचे आगमन झाले आहे. आगामी काही दिवसात परिसरात मुसळधार पावसाची शेतकरी बांधवास प्रतीक्षा आहे. कारण खरीप हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात सध्या पावसाची गरज आहे. कारण सोयाबीन, कापूस, तूर आदी बागायत पिकास जोरदार पाऊसाची गरज असून तर जनावरांच्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे खरीप हंगामातील पिकास जवळपास २५ दिवसांनंतर आज वरून राजाचे आगमन झाल्याने खरिपांच्या पिकास जीवनदान मिळाले आहे.