Fuel crisis update : पेट्रोल-डिझेल विक्रीवरील निर्बंध शिथिल

जिल्हा पुरवठा विभागाचा निर्णय, पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली
Fuel crisis update
पेट्रोल-डिझेल विक्रीवरील निर्बंध शिथिल pudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : जिल्हयात पेट्रोल व डिझेल विक्रीवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यातून पेट्रोलपंपावरील गर्दी कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. तर जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.

जिल्हाात मागील चार दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा साठा संपत असल्याबाबत अफवा पसरू लागल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी गर्दी होऊ लागली होती. त्यातून वादाचे प्रकार देखील घडू लागले होते. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने पेट्रोल पंपावरून कोणालाही कॅन किंवा बाटल्यांमधून पेट्रोल देऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Fuel crisis update
kolhapur | दुचाकीस 200, रिक्षा, मोटारीस आता दोन हजारांचेच पेट्रोल

या शिवाय चार चाकी वाहनांसाठी 2 हजार रुपये तर दुचाकी वाहनांमध्ये दोनशे रुपयांचेच इंधन देण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना देण्यात आल्या होत्या. मात्र या निर्बंधामुळे वाहन चालकांमधून गैरसमज निर्माण होऊन गर्दी कमी होण्याऐवजी गर्दीमध्ये वाढच झाली होती. त्यातच गर्दीला रोखणे कठीण होत असल्याने जिल्हा पुरवठा विभागाने थेट पोलिस अधीक्षक कार्यालयास पत्र देऊन जिल्हयातील शहरी भागातील पेट्रोल पंपावर दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त द्यावे, असे पत्रात नमूद केले होते.

या शिवाय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधून इंधन भरलेली वाहने तातडीने पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार जिल्ह्यात इंधन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार आता जिल्हयातील 84 पेट्रोलपंपावर 3.88 लाख लिटर पेट्रोल तर 5.74 लाख लिटर डिझेलसाठा उपलब्ध असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.

दरम्यान, पेट्रोलपंपावरील गर्दी टाळण्यासाठी पेट्रोल व डिझेल विक्रीच्याबाबतीत लावण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. वाहनधारकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये, वाहनधारकांनी आवश्यकतेनुसारच वाहनांमध्ये इंधन भरण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Fuel crisis update
Sangli News : अफवांच्या ‌‘गॅस‌’वर पेट्रोल

जिल्ह्यात इंधनाबाबत मदत व संपर्काबाबत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये औंढा तालुक्यासाठी नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, हिंगोली अनिल घुगे, कळमनुरी अमोल घुगे, सेनगाव विशाल लोहटे, वसमत पांडुरंग हांडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.

  • शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यात विविध कंपन्यांचे एकूण 288 के.एल. पेट्रोल, 574 के.एल. डिझेलचा साठा उपलब्ध आहे. तसेच घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी सिलिंडर 3 हजार 53 तर व्यावसायिक वापरासाठी 244 सिलिंडर उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news