Sangli News : अफवांच्या ‌‘गॅस‌’वर पेट्रोल

ग्राहकांच्या रांगा संपेनात; खरेदी-विक्रीचे गणित बिघडले
Sangli News
सांगली : शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावर गुरुवारीही ग्राहकांची गर्दी कायम होती.
Published on
Updated on

सांगली : पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्यानंतर चार दिवसापासून पेट्रोल पंपांवर वाहन चालकांनी मोठी गर्दी केली आहे. या अफवेमुळे रोजचा पेट्रोलचा खप 80 हजार लिटरने, तर डिझेलचा खप दीड लाख लिटरने वाढला आहे. यामुळे पंप चालकांचे विक्री-खरेदीचे गणित बिघडले आहे.

जिल्ह्यात गुरुवारअखेर पेट्रोल 24 लाख 60 हजार, तर डिझेल 26 लाख 20 हजार लिटर शिल्लक आहे. जिल्ह्यात पेट्रोलचा नियमित खप सुमारे साडेतीन लाख, तर डिझेलचा खप साडेसात लाख लिटर आहे. प्रशासनाने अनेकदा आवाहन करूनही वाहनधारक यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.

सांगली शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर चार-पाच दिवसापासून वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागत आहेत. पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे, या भीतीने वाहनचालक टाकी फुल्ल करीत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्पष्ट केलंय की, कुठेही पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पेट्रोलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही. वाहन चालकांनीसुद्धा पॅनिक होऊन अतिरिक्त पेट्रोलचा भरणा करू नये, असे वारंवार वाहन करूनही वाहन ारक मात्र यावर विश्वास ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. काल, गुरुवारी मात्र काहीशी गर्दी ओसरल्याचे दिसून आले. वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात इंधनाचा वाहनात भरणा केल्याने पेट्रोल पंपावर आता गर्दी कमी होऊ लागली आहे. सांगली जिल्ह्यात सर्व कंपन्यांचे मिळून 2460 किलोलिटर म्हणजे 24 लाख 60 हजार लिटर पेट्रोल, तर 2620 किलोलिटर म्हणजे 26 लाख 20 हजार लिटर डिझेल शिल्लक आहे. हा खप निम्माही होत नाही, तोपर्यंत आणखी इंधन मागवले जाते. यामुळे तुटवड्याची भीती ही सध्या तरी अफवा ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news