Infant Death Case : अर्भक मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा भोवला

एक वैद्यकीय अधिकारी निलंबित, एकाची वेतनवाढ थांबवली
 suspended News
suspended News file photo
Published on
Updated on

Negligence proves costly in infant death case

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणाच्या कारणावरून एक वैद्यकिय अधिकारी निलंबीत करण्यात आला असून एकाची वेतनवाढ थांबविण्यात आली तर चालकास कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत.

 suspended News
Jalna News : शववाहिनीऐवजी पालिकेच्या कचरा गाडीतून नेले पार्थिव !

नालेगाव येथील एक गरोदर महिला उपचारासाठी जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. मात्र महिलेची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना उपचारासाठी हिंगोली येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र केंद्राच्या रुग्णवाहिकेसाठी डिझेल व चालक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महिलेच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णवाहिकेद्वारे हिंगोली येथे नेले. मात्र यावेळी प्रसुती दरम्यान, महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्या पथकाने चौकशी करून जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर केला होता. यामध्ये वैद्यकिय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याचे स्पष्ट झाले होते.

 suspended News
child death reporting rule : खासगी रूग्णालयांना बालमृत्यू दडविणे महागात पडणार

आरोग्य विभागात खळबळ

या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणे तसेच निष्काळजीपणाच्या आरोपावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. मारोती केंद्रे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पूरजळकर यांची एक वेतनावाढ थांबविण्याचे आदेश दिले असून चालक रंजवे यास कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहेत. या कारवाईमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news